पारंपरिक चांदीच्या दागिन्यांसाठी संपूर्ण देशात नावारूपास आलेले शहर म्हणजे हुपरी..येथील चांदी व्यवसाय हा 100 वर्षांपासून चालत आलेला आहे. हुपरीभूषण स्व.य.रा.नाईक (आण्णा) यांनी 1950 रोजी चांदी कारखानदार असोसिएशनची स्थापना करून चांदी व्यवसाय हुपरी व हुपरी परिसरात घराघरात पोहोचवून चांदी उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे.
आज त्यांचा वारसा जपत मी त्यांचा नातू रवी विलासराव नाईक 2017 रोजी व्यवसायाची सुरुवात केली व आता रवी गोल्डच्या माध्यमातून सोन्याच्या ठुशी या प्रकाराचे दागिन्यांचे उत्पादन व विक्री करत आहे.